आपला विदर्भ

नापिकीला कंटाळून कारसपल्ली येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

विष प्राशन करून यूवा शेतक-याची आत्महत्या

सिरोंचा :- मुख्यालयापासून 12 कि.मी.अंतरावरील नारायणपूर ग्रामपंचायत हद्दीतील कारसपल्ली येथील एका युवा शेतक-याने नापिकीला कंटाळुण व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे विष प्राशन करून आत्महत्या केल्याने कारसपल्ली गावात खळबळ उड़ाली आहे.
आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव पोचम बापू (चंद्रय्या) कड़ेकरी,वय 37 असे असुन गेल्या नोव्हबर 2018 मध्ये अवकाळी पाऊस मुळे 3 एकर शेती मध्ये कापसाची लागवड़ केलेली होती त्यात प्रचंड़ प्रमाणात नुकसान झाले होते तरीही खचून न जाता पून्हा 3 एकरात मुंगाचे उत्पदण काढण्याचे निर्णय घेतला त्यात देखील त्याला प्रचंड़ किड़ लागल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे अखेर निराश होऊन पोचम याने शेतात विष प्रशान केले आपल्या शेतातूण परतूण आल्यावर धानाचे गवत घरी आणल्यावर अचानक घराबाहेर निघाला असता त्याचे पाय इकड़े-तिकड़े ड़गमगु लागल्याने गावातील काही लोंकानी सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता उपचारअंती पोचम ला ड़ाॅक्टरांनी मृत घोषीत केले.या घटनेने कारसपल्ली गावात शोककळा पसरली असून या प्रकरणाची पूढील तपास सिरोंचाचे पोलीस करीत आहे.