आपला विदर्भ

ताडगाव येथील समस्या सोडवू ..जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

भामरागड:-तालुक्यातील ताडगाव येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच समोर अनेक समस्या मांडले

. भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील गावातील गावकऱ्यांच्या अडीअडचणी व गावातील विविध प्रकारचे समस्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांचे समोर मांडले असता अथक प्रयत्न करून लवकरच ताडगाव या गावातील समस्या आपण प्राधान्याने सोडवु असे आश्वासन उपस्थित गावकऱ्यांना दिले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष ताडगाव येथील गावकऱ्यासोबत सोबत चर्चा करताना मादीजी आत्राम माजी सभापती, लालसू आत्राम उपसभापती सैनुजी आत्राम, प्रमोद आत्राम सरपंच, श्रीकांत बंडमवार सामजिक कार्यकर्ते न सेवक रेखा आत्राम पो पाटील महेश मद्धेरलावार सुनील राय अतुल मुंगेलवार देवुजी तलांडे सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार हे स्वतः ताडगाव येथे जाऊन गावातील गावकऱ्यांची आस्थेने विचारपूस करून गावातील सर्व समस्या प्राधान्याने सोडवून देण्याची आश्वासन दिल्याने ताडगाव येथील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले