आपला विदर्भ

मांड्रा येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

मांड्ररा येते भव्य क्रिकेट स्पर्धच्या उदघाटन
जिल्हा परिषद सदस्य मा.अजय नैताम यांच्या हस्ते सम्पन्न
▪बजरंग क्रिडा मंडळ मांड्ररा यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धचे उदघाटन *जि.प.सदस्य अजय नैताम ** यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे सदस्य *श्री.भास्कर तलांडे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून मांड्रराचे उपसरपंच श्री.विजय नैताम,माजी सरपंच माणिक मडावी,बिचू आत्राम,येचलीचे माजी सरपंच श्री.एस.कुंदरपवार,देवाजी मडावी,दिवाकर आलाम,माधव कुडमेथे,विलास मडावी,सुधाकर कन्नाके,आदि मंचावर उपस्थित होते.
या क्रिकेट सामान्यसाठी प्रथम पारितोषिक माजी आमदार मा.दिपकदादा आत्राम यांच्या कडून तर दुसरा पारितोषिक जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून बक्षीस ठेवण्यात आले.
यावेळी क्रिडा मंडळचे अध्यक्ष ,उपअध्यक्ष यांनी सहकार्य केले.यावेळी परिसरातील नागरीक व खेळाडू उपस्थित होते.संचालन व आभार प्रदर्शन श्री.शैलेश कोंडागूर्ले यांनी मानले.