महाराष्ट्र

महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात मुकडीगुठाचे तरुण गावडे याची निवड

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

शिवाजी महाविद्यालय गडचिरोलीचे विद्यार्थी व सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुठा येथील रहिवासी तरुण राघवलू गावडे या युवकाचा 19 वर्ष वयोगटात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुठा हे गाव व्हॉलीबॉल खेळासाठी सर्वत्र परिचित आहे.या गावातील व्हॉलीबॉल खेडाळूनी अनेकदा छत्तीसगढ,तेलंगणा व विदर्भातल्या क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक चषक जिंकत सिरोंचा तालुक्याचे नावलौकिक केले.

मुकडीगुठा हे गाव नक्षलग्रस्त व अविकसित गाव आहे.या गावात अठराविश्व दारिद्र्यात जन्मलेल्या तरुणचे वडील बालपणीच वारले.आज ही तरुणाचे कुटुंबाची आर्थिक परिस्तिती अठराविश्व दारिद्र्यचीच आहे.आई मोलमजुरी करून तरुणला शिकवीत आहे. पूर्वीपासूनच सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुठा हे गावच व्हॉलीबॉल क्रिडा विषयी परिचित असल्याने तरुणने बालपणापासूनच शिक्षणापाठोपाठ व्हॉलीबॉल कडे लक्ष दिले.

9 डिसेंबर ते 12 डिसें दरम्यान सांगली व उस्मानाबाद येथे 19 वर्ष वयोगटातील व्हॉलीबॉल संघाची निवड प्रक्रिया पार पडली यात तरुणची राज्यस्तरीय संघात निवड झाली. सध्या तो तामिळनाडू येथे राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल संघात महाराष्ट्र संघात खेळत आहे.

विशेष म्हणजे तरुणची आर्थिक परिस्तिती बिकट असल्याने मुकडीगुठा येथील गावकरी वर्गणी गोळा करून तरुणला नेहमी मदत करीत त्याला प्रोत्साहन देत आहे.