आपला विदर्भ

राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण करून रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा…अन्यथा चक्काजाम आंदोलन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुुजवा व रस्त्याची नव्याने नूतनीकरण करा…अन्यथा चक्काजामआंदोलन

सिरोंचाचे प्रभारी तहसीलदार श्री एच.एस.सय्यद यांना नागरिकांकडून निवेदन सादर
सिरोंचा -निजामबाद -जगदलपुर या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहन व रेती वाहतूक ट्रकांमुळे सिरोंचा शहारा जवळील धर्मपुरी या गावापासून तर आसरअली या गावापर्यंत मोठं मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची दुरुस्तीकडे सरकार व संबंधित विभागाकडून या रस्त्यावरील खड्डे अद्याप बुजविण्यात आले नसल्याने या रस्त्यावरअनेकदा अपघात होऊन जीवितहानी व अनेक जण जखमी झाले होते. याच रस्त्यावरून कालेश्वर मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाचे जड वाहन सुद्धा नेहमी ये जा करीत असतात .
या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कडे संबंधित विभागाचे व सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्यान काल या परिसरातील नागरिकांनी सिरोंचाचे प्रभारी तहसीलदार एच.एस.सय्यद यांना निवेदन देऊन येत्या तीन दिवसाचे आत रस्त्याची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम सुरू न केल्यास नागरिकांकडून चक्काजाम आंदोलनछेडण्याचा इशारा निवेदनातून सरकारला दिली आहे.