आपला विदर्भ

झिंगानूर ग्राम पंचायतीची ग्रामसभा विविध मुद्यांवर गाजली!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

*झिंगानूर येथील ग्राम सभा विविध मुद्द्यांवर गाजली*

*ग्राम सभेत अनेक समस्यांचे निराकरण *महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांचे पुढाकार.

सिरोंचा-पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत झिंगानूर येथिल सरपंचाचे मानमानी कारोबार व निष्काळजीपणामुळे गावाचा विकास खुंटला असून गावाच्या विकासाठी आलेली निधी वापस जाण्याचा मार्गावर असून गेल्या अनेक वर्षांपासून गावामद्ये कोणत्याही प्रकारचे विकास कामे झाले नाही. ग्राम पंचायत झिंगानूर ला पेसा कायदा अंतरंगात सन2017 वर्षी तेंदू संकलन चा रायल्टी 2कोठी,1लाख उत्पन्न मिळाली.14 वित्त आयोगा मार्फत 2016-17 व 2018-19 मद्ये 25 लाख,पेसा कायदा अंतर्गत आबांध निधी 30 लाख,2016 चे तेंदू बोनस मधील ग्राम पंचायत मधील गावाच्या विकासासाठी 20% रक्कम 20 लाख रुपये यापैकी एका ही रुपये खर्च न करता सरपंच आपल्या मानमानी काम करत असून ग्राम पंचायत चे कोणीही सदस्याला विश्वासात घेत नव्हते व ग्राम सभेत कोणत्याही प्रकारचे माहिती देत नव्हते. यामुळे गावाचा विकास कोसो दूर जात होती.यामुळे झिंगानूर गावातील लोक अनेक दिवसांपासून त्रासून गेले होते.

गावातील काही लोकांनी ही बाब गडचिरोली जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांचे कडे तक्रार केले.या तक्रारींचे गांभीर्याने दखल घेऊन झिंगानूर ग्राम पंचायतीचे तेंदू बोनस, 14 वित्त आयोग,पेसा आदी बाबीचे विषयी लोकांसमोर मांडावे व या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून ग्राम सेवक याना पत्रव्यवहार करून पत्र क्र 18/1/2019 आवक-जावक क्र 2 असून 7/2/2019 ग्राम सभा आयोजन करण्याचे सांगितले. सभापती यांचे आदेशाने ग्राम पंचायत झिंगानूर ला 7/2/2019रोजी ग्राम सभेची आयोजन करून त्या ग्राम सभेत सभापती हे स्वतः उपस्थित राहून गावातील लोकांसमोर ग्राम पंचायतीचे समस्या मांडून त्या समस्यांचे निराकरण केले.यावेळी ग्राम पंचायतीमद्ये जमा असलेल्या तेंदू बोनस 10 दिवसात वाटप करण्यात येईल व खर्च न झालेली निधीचे तात्काळ गावाचा विकासासाठी करण्यात यावे ग्राम पंचायतीचे प्रत्येक काम पारदर्शक असायला पाहिजे म्हणून उपस्थित लोकांना सभापती यांनी सांगितले.या सभेत प्रधान मंत्री आवास योजना,इंदिरा आवास योजना,इतर घरकुल योजना,विद्युत सेवकाचे निवड करणे,वन हक्क समिती गावनिहाय स्थापना करणे,गाव व्यसनमुक्ती करणे बाबत,14 वित्त आयोग/5 टक्के अबंध निधीचे विकास आराखडा तयार करणे या विषयावर ग्राम सभा गाजली आहे.
या ग्राम सभेचे अद्यक्ष म्हणून ग्राम पंचायत झिंगानूर चे सरपंच कारे मडावी होते.प्रमुख आथिती महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम जि. प.गडचिरोली हे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस स्टेशन झिंगानूरचे पोलीस उप निरीक्षक जाधव,पंचायत समिती सिरोंचा विस्तार अधिकारी भांडारे, काळबांधे,पेसा समन्वयक कडूकर,अविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, लाठाडे, ग्रा.प.उप सरपंच शंकर मडावी,ग्रा.प.सदस्य कैलास आत्राम,सचिव रणजित राठोड,ग्रा.पंचायतीचे कर्मचारी,आणि गावातील शेकडो नागरिक या ग्राम सभेला उपस्थित होते.