आपला विदर्भ

गडचिरोलीत उद्या ओबीसी समाजाची धरणे आंदोलन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

आज ठरविणार ओबीसी समाजाची दिशा

जिल्हास्तरीय बैठकीत उपस्थित राहण्याचे केले आवाहन

प्रतिनिधी/गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीं समाजाचे स्थान नगण्य असल्याने सातत्याने ओबीसी मुद्दा जिल्ह्यात तफावत असून जातीनिहाय जनगणने च्या मुद्द्यां बरोबर जिल्ह्यातील आरक्षण १९ टक्के आरक्षण पूर्वरत केल्या जावी या करिता सातत्याने मागणी केल्या जात आहे ,गेल्या निवडणूकीच्या दरम्यान २०१४ ला ओबीसी समाजाने काही बहिष्कार केला तर काहींनी नोटा चा वापर केला आणि ओबीसी च्या जोरावर महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त नोटा चा वापर गडचिरोली जिल्ह्यात झाला , येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाची नेमकी भूमिका काय असणार या बाबत आज दिनांक १० फेब्रुवारी रोज रविवार ला इंदिरा गांधी चौकातिल विश्रागृह येथे दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे तरीही जिल्ह्यातील समस्त ओबीसी पुढाऱ्यांनी ,कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे केले आवाहन

*उद्या धरणे आंदोलन*
उद्या दिनांक ११ फेब्रुवारी रोज सोमवार ला इंदिरा गांधीं चौकात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे , देशात गुरांची गणना केले जातो परंतु ओबीसी समाजाचे नाही , ओबीसी ची गणना नसल्याने समाजाला संख्येच्या प्रमाणात स्थान नाही , मनुन गणना आवश्यक असल्याने जातीनिहाय जगणनेच्या आकडेवारी करिता तसेच जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्वरत करण्याच्या मागणी करिता धरणे आयोजित करण्यात आले आहे तरीही ओबीसी समाजाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे