आपला विदर्भ

बचत गटाचे महिलांनी स्वतःच्या व्यवसाय उभं करावे …जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

बचत गटांच्या महिलांनी स्वतःच व्यवसाय उभे करावे

कमलापूर येते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,महिला आर्थिक विकास महामंडळ व संघर्ष लोकसंचालित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने *गजराज महोत्सव,तेजस्विनी संमेलन **कमलापूर येतील समाज मंदिरच्या भव्य पटांगणांवर दिनांक ७ ते १०फेब्रुवारी २०१९ पासून सुरु असून ठिकाणी महिला क्रिडा स्पर्धा व बचत गटाद्वारे उत्पादित साहित्यांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे.या महोत्सव च्या एक भाग म्हणून,
कल दिनांक ८ फेब्रुवारी ला *कमलापूर पर्यटन व रोजगार निर्मिती कार्यशाळा ** आयोजीत करण्यात आली होती सदर कार्यक्रमाच्या उदघाटन जिल्हा परिषद गडचिरोलीचे उपाध्यक्ष *श्री अजयभाऊ कंकडालवार ** यांचा हस्ते करण्यात आली,उदघाटनस्थानावरून महिला मार्गदर्शन करतांना बोलले कि आज महिलांनी सर्वच क्षेत्रात समोर आहेत पुरुषाप्रमाणे महिलांना सुध्दा वेगवेगळे कार्यात क्षेत्रात काम करण्याच अधिकार प्रदान केले आहे.त्याचा योग्य वापर करून महिलांनी स्वतच कुटुंबाच्या, गावाच्या,राज्याच्या,व देशाच्या विकासासाठी बचत गटाचा माध्यमातून महिलांनी महिन्याला पैसे गोळा करून आर्थिक बचत करत असतात व लहान मोठे उद्योग करून रोजगार देण्याच काम महिलांनी करत आहेत,व स्वतच आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करतांना दिसत आहे.जिल्हा परिषद,पंचायत समिती,कृषि विभाग,आदिवासी विकास प्रकल्प असेल किंवा विविध बँकाकडून महिला बचत गटांना विविध योजना असतात ते बचत गटांनी लाभ घेवुन आपली आर्थिक पाया मजबूत करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्य श्री.भास्कर तलांडे यांनी सुध्दा मार्गदर्शन करतांना म्हणाले कमलापूर गावाची ओळख आज सम्पूर्ण जगला माहीत आहे.कमलापूर येते हत्तीकॅम्प असून याठिकाणांनी हत्ती व निसर्गरम्य तलाव पहावयास मिळतो,या हत्तीकॅम्पला पर्यटन क्षेत्र म्हणुन घोषित करण्यासाठी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा व वेळोवेळी आन्दोलने सुध्दा करण्यात आले मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.या हत्तीकॅम्पला जर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यास विविध भागातून याठिकाणांनी पर्यटक येतील व या भागातील युवकांना व महिलां बचत गटांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम होते.प्रमुख अतिथि म्हणून कमलापूरचे सरपंचा रजनीता मडावी,अहेरी पंचायत समितीचे सभापती सुरेखा आलाम,प.स.सदस्य श्री.भास्कर तलांडे,सह.प्रकल्प अधिकारी आर.एस.बोनगिरवार,एस.पड़घान,गोविंदगावचे सरपंच शांकरीबाई पोरतेट,ग्रा.प.सदस्य श्री.महेश मडावी,सामाजिक कार्यकर्ता श्री.संतोष ताटिकोंडावार,माधव कुडमेथे,बक़या चौधरी,सावित्री चिपावार,आदि मंचावर होते.
या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला बचत गटाचे महिला व गावकरी उपस्थित होते.