आपला विदर्भ

चपराळा येथे विश्वस्त संचालक मंडळाकडून जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम विश्वस्त संचालक मंडळाकडून आज गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शाल श्रीफळ व पं.पु.संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या फोटो देऊन सत्कार करण्यात आलं.

महाशिवरात्री निमित्य आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कंकडालवार यांनी चपराळा येथील मंदिराला भेट दिले असता त्यांच्या हस्ते मंदिरात मुख्य पूजा अर्चना करण्यात आलं. यावेळी त्यांच्या विश्वस्त मंडळाकडून सत्कार करण्यात आलं.या प्रसंगी विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी,संचालक व भक्तजन मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्री, हनुमान जयंती व कार्तिकस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीला हजारो भाविकांची गर्दी राहते.