आपला विदर्भ

चपराळा येथे महाशिवरात्री यात्रेचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

प्रशांत धाम चपराळा येते महाशिवरात्री यात्रेच उदघाटन
जि.प.उपाध्याक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते
गडचिरोली जिल्हातील श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येते दिनांक ३-३-२०१९ ते दिनांक ७-३-२०१९ पर्यंत असे पाच दिवस महाशिवरात्री यात्रा निमित्ताने भक्तजनाच्या व साधुसंताच्या ६४व्या भव्य मेळावा आयोजीत करण्यात आली आहे.
सदर महाशिवरात्रीच्या घटस्थापना श्री.किशनराव गरपलीवार यांच्या हस्ते करण्यात आले.तर पं.पू.संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या क्रूपेने महाशिवरात्री यात्रेच्या उदघाटन जि.प.उपाध्याय श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली आहे.
यावेळी चामोर्शी पंचायत समितीचे सभापती श्री.आनंदजी भांडेकर,प्रशांत धामचे अध्यक्ष श्री.पंदिलवार,सचिव श्री.विठ्लराव गारसे,कुंदावार,जिवतोडे,आदि मान्यवर उपस्थित होते