आपला विदर्भ

उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर माजी आमदार आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांचे आमरण उपोषण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरीचे माजी आमदार व आविसं नेते दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी काल पासून (6 मार्च)एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले .

16 जानेवारी ला लोहदगड वाहतूक करणारे लॉयड मेटल कंपनीचे ट्रक व परिवहन मंडळाच्या बस यांच्यात भीषण अपघात झाल्याने यातील मृतकांना व जखमींना लॉयड मेटल कंपनी व महामंडळा कडून आर्थिक मदतीसह मृतकांच्या कुटुंबातील एकाला नोकरी सह अनेक आश्वासन 17 जानेवारीला फॉरेस्ट नाका जवळील चक्काजाम आंदोलन दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना व मृतक व जखमी कुटुंबियांना आश्वासन दिले.यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक सह अनेक राजकीय पुढारी व हजारो आंदोलनकर्ते उपस्तीत होते. परंतु दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्याने भर उन्हात आविस नेत्यांनी आंदोलन पुकारले.

या भीषण अपघाताचे घटनेला दीड महिना उलटल्यानंतर हि आश्वासनाची पूर्तता सरकार, परिवहन महामंडळ व लॉयड मेटल कंपनीकडून न झाल्याने आश्वासनपूर्तीसाठी अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी काल पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.

आमरण उपोषणाची आजचा दुसरा दिवस आहे.