आपला विदर्भ

रंगय्यापल्ली येथे आविसं कडून चक्काजाम आंदोलन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

*रंगय्यापल्ली येथे अविस शाखा सिरोंचा कडून चक्का जाम व रास्ता रोको आंदोलन* सिरोंचा-एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली जवळ लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक व बसच्या अपघातात बसमधील काही प्रवाशी मृत्यू झाले होते.काही प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. अपघाता नंतर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मृतक कुटुंबाना लायड मेटल्स कंपनी कडून 25 लाख रुपये व परिवहन महामंडळाकडून 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात असे अस्वासन दिले होते.आश्वासन देऊन 2 महिन्या उलटून सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याने अहेरी विधान सभेचे माजी आमदार दीपक दादा आत्राम व जि. प.चे उप अध्यक्ष अजयभाऊ कांकडलावार यांनी ही मागण्या घेऊन 6मार्च 2019 पासून उपविभागीय कार्यलाय येथे आमरण उपोषण करत आहेत.या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आज रंगाय्यापाली येथे सिरोंचा-अहेरी मुक्या रस्त्यावर चक्का जाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. या चक्का जाम आंदोलनाला महिला व बाल कल्याण सभापती जयसूधा जनगाम, पंचायत समिती सदस्य शकुंतला झोडे, अविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,अविस सल्लागार रवी सल्लाम,सरपंच यशोदा कोडपे,विजया आसाम, उप सरपंच तिरुपती दुर्गम,लक्ष्मण गावडे,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गट्टू चमकरी, विजय रेपालवार,संतोष पडलावार,बिरा आत्राम,लक्ष्मण बोले,रवी सुलतान,रवी बॉंगोनी,इरपा मडावी,नागराजू इंगली,महेश भंडारी,मधुसूदन चिंतावार,श्रीनिवास गुरनुले,माराना मोरे,वेंकटी दासरी, जन्मपना आसामपल्ली,वेंकटी कार्सपल्ली,अशोक इंगली,वासू सपाट,तिरुपती बोरकुटे,किरण वेमुला,सरपंच किष्टय्या सिडाम,किष्टय्या,साई मंदा,सुरेश झाडी,महेश मेडी,गणेश बचलकुरा,अजय आत्राम,अंकुलू जनगाम,सत्यम कुमारी हे उपस्थित होते.
या चक्का जाम व रास्त रोको आंदोलनाचे प्रमुख मागण्या 1)प्रत्येक मृतकाच्या कुटुंबियांना लायड मेटल्स प्रा.लि. कंपनी कडून 25 लाख रुपये व परीवाहन महामंडळ कडून 10 लाख रुपये आर्थिक मदत देणे.2)जखमी प्रवाश्याचे पूर्ण उपचार करून त्यांच्या परिस्थितीनुसार लायड मेटल्स प्रा.लि. कडून आर्थिक मदत मिळवून देणे.3)लायड मेटल्स कंपनी प्रा.लि. चे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सुरू असलेल्या लोहखनिज उत्खनन व वाहतूक कायमस्वरूपी बंद करू.4)सदर घटनेमध्ये काही आंदोलकवार गुन्हे दाखल केले होते.ते गुन्हे परत घेण्यात यावे.5)सदर प्रकरणात जाळलेल्या ट्रकची नुकसानभरपाई लायड मेटल्स कंपनी प्रा.लि. कडून ट्रक मालकांना देन्यात यावी हे प्रमुख मागण्या घेऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम व जि. प.उप अध्यक्ष अजयभाऊ कांकडलावार यांनी एटापल्ली येथील उप विभागीय कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषनाला बसले आहेत .या आमरण उपोषनाला जाहीर पाठिंबा देत सिरोंचा तालुका अविस शाखेचा वतीने आज रंगाय्यापाली येते चक्का जाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहेत. या वेळी आंदोलन कर्त्यांनी सिरोंचाचे प्रभारी तहसीलदार एच.एस. सय्यद यांचा मार्फतीने मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व गडचिरोली चे जिल्हा अधिकारी यांना पाठवून वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा देण्यात आला. अविसचा चक्का जाम आंदोलनाला पोलीस विभागा कडून चोख बंदोबस्त करण्यात आला.