आपला विदर्भ

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

विय्यमपल्ली येथे हनुमान मंदिराचे उदघाटन व हनुमान मूर्तींचे प्राणप्रतिष्ठापना

*माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्तीतीत मुख्य पूजा कार्यक्रम संपन्न*

*विय्यमपल्ली येथील गावकऱ्यांनी केले माजी आमदार दिपक आत्राम यांची जंगी स्वागत*

सिरोंचा…तालुक्यातील रंगय्यापल्ली जवळील विय्यमपल्ली येथे येथील गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून भव्य दिव्य असे नवीन हनुमान मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते.

या मंदिरात हनुमान मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रमाला 11 मार्चपासून सुरू करण्यात आले.
11 मार्च ते 12 मार्च पर्यंत विविध विधीवत पूजा अर्चना कार्यक्रम तर काल 13 मार्च ला सकाळी हनुमान मूर्तींचे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आले.
आजच्या या हनुमान मूर्तीचे प्राणप्रतिष्टापना मुख्य कार्यक्रमाला अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम सह आविस पदाधिकाऱ्यांनी उपस्तीत लावले.
यावेळी विय्यमपल्ली येथील गावकऱ्यांनी माजी आमदार दिपक दादा आत्राम व आविस पदाधिकाऱ्यांची ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिष बाजी करीत जंगी स्वागत केले.
या हनुमान मंदिराचे उदघाटन व हनुमान मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला माजी आमदार दिपक दादा आत्राम सह जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनगम, पंचायत समिती सदस्या शकुंतला जोडे, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम, आविस सल्लागार रवी सल्लम, संतोषभाऊ पडाला , सरपंच विजया आसाम, जेष्ठ नागरिक मारांना पडाला,ग्राम पंचायत सदस्या प्रमिला गावडे, पदमा दासरी, अल्लापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके, बिरा आत्राम, दुर्गम बानाय्या , पानेम शंकर, श्रीनिवास इप्पा, सडवली कोंडगोरला, रवी बोनगोनी, रवी कुमारी, रवी सुल्तान, दासरी वेंकटी मुकेश पेय्याला,मधुकर बुरम, नागराजू इंगीली, अशोक हरी आदी मान्यवर उपस्तीत राहून हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले.
हनुमान मंदिर कमिटी कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसादाचे आस्वाद शेकडो हनुमान भक्तांनी घेतले.
सलग तीन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रम व हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्टापना कार्यक्रमाला शेकडो भाविक व नागरिक उपस्तीत होते. विय्यामंपल्ली येथे गावकऱ्यांकडून आयोजित हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्टापन व नवीन हनुमान मंदिराचे उदघाटन सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला.