आपला विदर्भ

अंकीसा येथील हनुमान महायज्ञ व होमकुंड हवन कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांची प्रमुख उपस्थीती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*अंकीसा येथील हनुमान महायज्ञ व होमकुंड हवन कार्यक्रमाला माजी आमदार दीपक दादा आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांची उपस्थीती*

*सिरोंचा*…तालुक्यातील अंकीसा येथे 29 मार्च पासून येथील हनुमान दिक्षा समिती व मित्र मंडळ अंकीसा कडून अष्टोत्तर शतकुण्डात्मक नवग्रह शांती व हनुमान महायज्ञ व 108 महाकुंडाचे हवन कार्यक्रम आयोजित करण्यात आल होता.
या हनुमान महायज्ञ व 108 होमकुंड हवन कार्यक्रमाला प्रवचनकार व दर्शनरूपी म्हणून अखिल भारतीय हनुमान दिक्षापीठ विजयवाडा चे पीठाधीश श्री श्री श्री दुर्गाप्रसाद स्वामीजी यांनी तीन दिवस भविकांना आशीर्वाद रूपी दर्शन देऊन तीन दिवस प्रवचन दिले.
आज या हनुमान महायज्ञ व होमकुंड हवन कार्यक्रमाची समाप्ती निमित्य या कार्यक्रमाला अहेरी चे माजी आमदार दिपक दादा आत्राम व गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी भेट देऊन या होम हवन कार्यक्रमात पूजा अर्चना करुन पीठाधीश श्रीश्रीश्री दुर्गाप्रसाद स्वामीजी यांचे दर्शन घेतले.
माजी आमदार दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आयोजक मंडळाला आर्थिक देणगी दिले.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक् अजयभाऊ कंकडालवार यांच्या सोबत मेचनेनी मोहनराव, बेल्लमकोंडा सत्यय्या, रमेश तैनेनी,तोरकरी समय्या,संजय चिंतकानी,शंकर तेरकरी, दुर्गय्या कोठारी, रवी सल्लम, धर्मय्या कोठारी, रवी बोगोनी, मारोती गणापूरपू, किरणकुमार वेमुला आदी उपस्तीत होते.
अंकीसा येथे सलग तीन दिवस हनुमान महायज्ञ व होमकुंड हवन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.