आपला विदर्भ

येल्ला येथील विविध पक्षाचे युवक कार्यकर्त्यांची आविसं मध्ये प्रवेश

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*येल्ला येथील विविध पक्षाचे युवक कार्यकर्त्यांची आविसं मध्ये प्रवेश*

*माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची स्वागत*

*मूलचेरा*…तालुक्यातील लगाम जवळील येल्ला या गावातील विविध पक्षाचे अनेक युवक कार्यकर्त्यांनी आविसंचे विदर्भ नेतृत्व व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम व आविसंचे विदर्भ सल्लागार व गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत आदिवासी विद्यार्थी संघात गुरुवारी प्रवेश केले.
आदिवासी विद्यार्थी संघ शाखा येल्ला कडून काल येल्ला येथे आविस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलं होता.
या बैठकीला अध्यक्ष म्हणून माजी आमदार दिपक दादा आत्राम तर प्रमुख अतिथी म्हूणून आविस सल्लागार महावीर अग्रवाल, येल्ला ग्राम पंचायतीचे सरपंच गजानन आलाम, लगाम ग्राम पंचायतीचे सरपंच मनीष मारटकर, उपसरपंच देवाजी शिडाम, ग्राम पंचायत सदस्य रमेश शिडाम, आल्लापल्ली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विजयभाऊ कुसनाके, संतोष मडावी, गुलाब दब्बा, निराजी मडावी,जुलेखभाई शेख, मधुकर मडावी, विष्णु ढाली, सुधाकर कोरेत, संदीप पाटील बेडगे आदी मान्यवर उपस्तीत होते.
या बैठकी दरम्यान येल्ला येथील युवक कार्यकर्ते अशोक आत्राम,सुनील आलाम,राजेश कोडापे,गंगा आत्राम,प्रभाकर सेडमाके, हिरामण आलाम,रवी आत्राम, संतोष आत्राम, यशवंत कोडापे, साईनाथ आलाम, यादव रामटेके,रामदास झाडे,प्रवीण रामटेके आदी अनेक युवक कार्यकर्त्यांनी आदिवासी विद्यार्थी संघात प्रवेश केले.
आविसं मध्ये पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन आदिवासी विद्यार्थी संघात स्वागत केले.