आपला विदर्भ

समाज उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे….कंकडालवार यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

समाज उन्नतीसाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे
जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांचे प्रतिपादन

📝अहेरी तालुक्यातील राजाराम येथे पंचशिल बहुउद्देशीय विकास संस्था राजाराम कडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वि जयंती कार्यक्रम साजरी करण्यात आली.सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागथ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मोमबत्ती पेटवन्यात आली,त्यानंतर जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आली.
त्यावेळी उदघाटन स्थानावरून बोलतांना *जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार**म्हणाले आज बाबासाहेबाच्या जयंती कार्यक्रम आपण साजरी करत आहोत त्यानिमित्तने सर्व समाज घटक एकत्रित आलो असून बाबासाहेब हे एका समाजचे उन्नतीसाठी नाही तर देशाच्या सर्वांगीण विकास व्हावे यांकरीता म्हणून संविधान निर्माण केली त्या आधारे आपण सर्वानी जात,पात,धर्म,भेदभाव विसरून समाजाच्या,गावाच्या व देशाच्या विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी प.स.सदस्य श्री.भास्कर तलांडे यांनी सुध्दा उपस्थितीतना मार्गदर्शन केले.
या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजारामचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.अमोल खटावकर होते तर प्रमुख अथिति म्हणून प.स.सदस्य श्री.भास्कर तलांडे,राजारामचे उपसरपंचा सौ.सुरक्षाताई आकुदर,तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम प.सदस्य श्री.नारायण कम्ब्गौनिवार,वंदना अलोने,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,देवलमरी ग्रा.प.चे सदस्य श्रीनिवास राऊत,नागेश कन्नाके,सुरेश सोयाम,खोब्रागडे,वनकर,आदि मंचावर होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री.अँड.हनमंंतू आकुदर यांनी केली यावेळी गावातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.जयराम दुर्गे,तूलशिराम झाडे,मनोज आकुदर,सुधाकर गोंगले,मधुकर गोंगले,तिरुपती दुर्गे,विलास दुर्गे,साईनाथ दुर्गे,लिंबूना गोंगले,रेखाताई गोंगले,आदि सहकार्य केले.