आपला विदर्भ

छेल्लेवाडा गावाला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

छलेवाडा गावातील नागरिकांशी चर्चा
🔸*जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या*
▪विविध समस्या जाणून घेतली
▪येतील समस्या प्राधान्याने सोडवू
▪जि.प.शाळेच्या नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी जागेची पाहणी
📝अहेरी तालुक्यातील रेपनप

ली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या छलेवाडा गावात सात ते आठ मोहल्ले असून गाव विस्ताराने मोठा असल्याने गावात विविध समस्या निर्माण झाले आहेत.पाण्याची,गली रस्ते,नाली व विद्युत फोल आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.
तसेच जेडपी मोहल्लात जिल्हा परिषदेची शाळा असून इमारत एकच असल्याचे सांगितले यावर जि.प.उपाध्यक्षनी एक नवीन इमारत याठिकाणी देण्यात येईल असे सांगितले यांवर नागरिकांनी सांगितले कि,नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी जाग नाही.मात्र शाळा व्यवस्थापण समिति व गावातील नागरिकाकडून वर्गणीतून शाळेसाठी जाग घेण्याची ठरवले असून वर्गणी गोळा करत आहोत.
तर यावेळी जि.प.उपाध्यक्ष भर उन्हात सुध्दा जावून सदर जागेची पाहणी केली असून येत्या काही दिवसांत आपण याठिकाणी नवीन इमारत उपलब्ध करून देवू असे शब्द दिले आहे.
तसेच येतील नागरिकांनी मुख्य चौकात बैठक घेवुन चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असून सदर समस्याचे आपण निराकरण करू असे सांगितले.
यावेळी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,प.स.सदस्य श्री.भास्कर तलांडे,रेपनपलीचे उपसरपंच श्री.मोंडी कोटरंगे,ग्रा.प.स.विलास बोरकर,शंकर भासरकर,सीताराम मडावी,दासु कांबळे,लक्ष्मण जंगम,वसंत चव्हाण,नागेश कन्नाके,सुरेश पेंदाम,मुरमाडे,आदि उपस्थित होते