आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथील आपद्ग्रस्त कुटुंबाला माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

टेकडाताल्ला येथील आगग्रस्त कुटुंबियांना माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

*सिरोंचा*…तालुक्यातील टेकडाताल्ला येथील गण्यारपू पोचन्ना यांचं घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्यामुळे त्यांचे राहते घर व घरातील सर्व सामान साहित्य जळून खाक झाल्याने गण्यारपू कुटुंब उघड्यावर पडले.
जाफराबाद व टेकडाताल्ला येथील आविसं कार्यकर्त्यांनी आविस नेत्यांना या घटनेची माहिती दिली असता माजी आमदार दिपक दादा आत्राम , गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार व जिल्हा परिषद सदस्य अनिता दिपक आत्राम सह आविसं पदाधिकाऱ्यांनी टेकडाताल्ला गावाला भेट देऊन आगग्रस्त कुटुंबीय गण्यारपू पोचनां यांच्याशी या घटनेची माहिती जाणून घेतले.यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व जिल्हा परिषद सदस्य अनिताताई आत्राम यांनी आगग्रस्त कुटुंबीय गण्यारपू पोचनां यांना आर्थिक मदत दिली व सरकारकडून जास्तीचे मदत मिळवून देण्याची आश्वासन दिले.
यावेळी जाफराबाद ग्राम पंचायतीचे सरपंच बापू सडमेक,आविस युवा नेते सुधाकर पेद्दी,उपसरपंच तिरुपती दुर्गम,विजय रेपालवार,महेश भंडारी,आल्लापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय कुसनाके,वाईल तिरुपती,राजशेखर तन्नीर, सोदारी कुंकूमय्या, माजी सरपंच इरफा मडावी, कोटा वेंकांना,दुर्गम तिरुपती, सडवली दुर्गम,महेश दुर्गम, साई मंदा,प्रशांत पेद्दी,पर्वतालु मंडेला,साईकीरण मंडेला,प्रवीण इंदुरी,सुरेश जाडी,आकाश गादे,रवी बारसागडे वेंकटस्वामी रामटेके आदी आविस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.