आपला विदर्भ

शेतकऱ्यांचे उन्हाळी धान खरेदी अन्यथा चक्काजाम आंदोलन करू

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

शेतकऱ्यांची उन्हाळी धान खरेदी करा अन्यथा चक्काजाम आंदोलन करू
*नारायणपूर येथील शेतकऱ्यांची सरकारला तीव्र इशारा*

*तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर*
*सिरोंचा*…तालुक्यातील शेतकरी दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान उत्पादन केले असून धान खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांनी उत्पादन केलेली धान अद्याप हि खरेदी करत नसल्याने काल नारायणपूर(कारसपल्ली) येथील शेतकऱ्यांनी सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांचमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून उन्हाळी धान खरेदी करण्याची मागणी व मागील वर्षीचे धानाचे बोनस अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नसून तात्काळ बोनस ही मिळवून देण्याची मागणी केली.
तालुक्यात सहा धान खरेदी सेंटर असून अद्याप एकही सेंटरवर उन्हाळी धान खरेदी करत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकरप्रति तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.
काल कारस्पल्ली येथील शेतकऱ्यांनी सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांना भेटून उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी निवेदन दिले.यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांसमोर संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संवाद करून तालुक्यातील सहाही धान खरेदी केंद्र सुरू करून तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी धान खरेदीकरण्याचे सांगितले असता संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात येईल म्हणून तहसीलदारांना सांगितले.
नारायणपूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात जर सात दिवसाचे आत उन्हाळी धान खरेदी सेंटर सुरू न झाल्यास 17 मे ला नारायणपूर (कारसपल्ली) येथे चक्काजाम करण्याचं इशारा शेतकऱ्यांनी दिली आहे.
तहसीलदारांना निवेदन देतांना आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम, आविस सल्लागार रवी सल्लम सह नागराजू इंगीली, पांते मल्लय्या,अशोक हरी,मारय्या मोरे,गट्टू चमकरी,अशोक इंगीली,दुर्गांना तोम्बरा, किष्टय्या कडेकरी,राजू इंगीली, राजू कडेकरी, राजबापू नुकूम, रामुलू इंगीली, येल्लय्या कडेकरी, वेंकटी रापेल्ली, संपत हरी, लक्ष्मीस्वामी अंनेला,कोटेश दाया, आनंदराव रापेल्ली,पोचम चमकरी,वेंकांना भीमकरी,पोचम चमकरी,चंद्रशेखर चमकरी, गट्टू कडेकरी,नारायण मोरे, सुधाकर नूसेट्टी,चंद्रय्या नास्कुरी,महेश दाया,राघवलु हरी,तिरुपती हरी आदी शेतकरी उपस्तीत होते.