आपला विदर्भ

कालेश्वर ला पर्यटन स्थळ घोषित करून विकास कामांसाठी शंभर कोटी रु.निधी उपलब्ध करून देऊ…के.सी.आर.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

तेलंगणातील पवित्र पुण्य क्षेत्र कालेश्वर ला लवकरच पर्यटन स्थळ घोषित करून येथील कालेश्वर मुक्तेश्वर मंदाराची जिर्णोद्दर कामासह परिसराची सर्वांगीण विकासासाठी तेलंगण सरकार व देवदाय शाखे कडून तब्बल शंभर कोटी रु निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ग्रामस्थ व येथील मंदिराचे पुरोहितांना दिले.

मागील रविवारला तेलंगण मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी सहपत्नीक येथील कालेश्वर मुक्तेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिरात पूजा अर्चना केले.यावेळी त्यांनी उपस्थितांना वरील ग्वाही दिली.

कंनेपल्ली येथील मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाची पम्प हाऊसची पाहणी साठी त्यांनी रविवारला कालेश्वर ला दौरा केले.

कालेश्वला पर्यटन स्थळ घोषित करून विकासासाठी कालेश्वर व लागून असलेल्या परिसरातील अंदाजे शंभर एकर वनजमीन,महसूल व खाजगी जमीन भुसंपादन करून यात वेदपाठशाला,सुशोभित बगीचा,भक्तनिवास, व्ही आय पी साठी निवास स्थान, सत्संग व प्रवचनासाठी आवश्यक जागा,पुरोहितांसाठी निवास स्थान आदी सोय करणार असल्याची विश्वानिय माहिती आहे.