आपला विदर्भ

विय्यमपल्ली येथे नवीन बंधाऱ्याचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

विय्यमपली येथे नवीन बंधाऱ्याचे भूमीपूजन महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांचे हस्ते भूमिपूजन

सिरोंचा

तालुक्यातील विय्यामपली येथे सर्वसाधारण उपयोजना 2018-2019 अंतर्गत नवीन बांधाराचे भूमिपूजन महिला व बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली यांचे हस्ते करण्यात आले.विय्यामपली गावाजवळून नाला बाराही महिने वाहत असल्याने ही पाणी वाया जात होते.वाया जाणारा पाणी अडवल्याने या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करता येते ही बाब लक्षात घेता महिला व बाल कल्याण सभापती यांनी जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा करून सर्वसाधारण उपयोजने अंतरंगात विय्यामपली येथे नवीन बांधारा मंजुरी करून आणले. भूमी पूजनेचा वेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष बान य्या जनगाम,माजी तंटामुक्त अद्यक्ष संतोष पाडालवार, मधुकर बुरम, रवी कुंमरी,सिंचाई विभाचे भगवान पिल्लीवर,सुरेश बच्चलकुरा आणि अविसचे कार्यकर्ते उपस्थित होते.