आपला विदर्भ

सिरोंचा येथे बुरुड समाजाच्या दोन दिवसीय मेळावा थाटात संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली शहर बुरुड समाज व सिरोंचा तालुका बुरुड समाजाकडून पहिल्यांदाच सिरोंचा येथे मोठ्या थाटात जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ विद्यालयाच्या सभागृहात 8 व 9 जूनला समाजाच्या दोन दिवसीय मेळावा पार पडला.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सम्पर्क प्रमुख किशोर चंद्रकांत पोतदार,मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून बुरुड समाजाचे नेत्या व चंद्रपुर जिल्हा परिषदेचे सदस्या स्वाती किशोर वडपल्लीवार,शिवसेनेचे नेते
किशोर जोरगेवार सह समाजाचे अनेक मान्यवर उपस्तीत होते.

मेळाव्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली.मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून बुरुड समाजाचे गडचिरोली जिल्हा कार्यअध्यक्षव शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुक राजगोपाल सुलभावार,शिवसेनेचे समनव्यक अरुण दुर्वे विदर्भ बुरुड समाज संघटना अध्यक्ष प्रभाकरराव पटकोटवार , बंडू गहनेवार, ज्येष्ठ पत्रकार आनंद मांडवे,सुनील राजबाबू पिल्लीवार सह मान्यवर उपस्तीत होते.

बुरुड समाजाच्या दोन दिवसीय मेळाव्यात उपस्तीत मान्यवरांनी समाजाबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केले.समारोपीय कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम व उपवर वधु परिचय मेळावा घेण्यात आला.

बाहेरून आलेल्या समाज बांधवांसाठी येथे मेळावा आयोजका कडून राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली.

या मेळाव्याला गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील समाजबांधवासह सिरोंचा तालुक्यातील बुरुड समाजाचे मोठ्या संख्येने उपस्तीती होती.