आपला विदर्भ

अहेरी ते राजाराम (खांदला) बस पूर्ववत सुरू करा !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी ते राजाराम (खाँ) बस पुर्ववत सुरू करा
▪पंचायत समिति सदस्य श्री.भास्कर तलांडे यांची मागणी
📝राजाराम:-अहेरी मुख्यालयापासून ३०कि.मी.अंतरावर असलेल्या राजाराम -कमलापूर-रेपनपली बस सेवा सुरू होती मात्र गेल्या पाच महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू असल्याचं कारण सांगून सदर बस सेवा बंद करण्यात आले आहे.त्यामुळे या परिसरातील खाँदला,चिरेपली,पतीगाँव,मरनेली,रायगटटा,गोलाकर्जी,छल्लेवाडा,कोडसेलगुड्म,आदि गावातील नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अहेरी आगारातील बस सेवा अहेरी- कमलापूर-रेपनपली या पध्दतीने सुरळीत सुरू होती गेल्या पाच महिन्यापासून बंद आहे.आत्ता काही दिवसातच शाळेला सुरुवात होणार असून या भागातील विध्यार्थी कमलापूर व आलापली,अहेरी येते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जात असतात त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात सदर बस सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात यावी.अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी निवेदनाद्वारे पंचायत समिती सदस्य श्री.भास्कर तलांडे यांनी अहेरी आगारातील आगार व्यवस्थापाक श्री.व्ही.एम.रोठोड यांच्याकडे केली आहे.