आपला विदर्भ

कमलापूर येथील जलकुंभाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

कमलापूर येते पाणी टाकीचे भूमिपूजन
▪जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या शुभहस्ते सम्पन्न
▪जि.प.सदस्य श्री.अजय नैताम यांचा पाठपुराव्याला आले यश.
✒अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय कमलापूर येते पेयजल पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत १ कोटी १३लाख रु.मंजूर करण्यात आले असून कमलापूर उमानूर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम यांनी नवीन पाण्याचा टाकीसाठी पाठपुरावा केले असून त्याच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच कमलापूर वाशीयांना सुध्द पाणी उपलब्ध होणार आहे.
तसेच रेपनपली ग्राम पंचायतीमध्ये सुध्दा नवीन पाणी टाकी मंजूर करण्यात आली असून येत्या काही दिवसातच भूमिपूजन करण्यात येईल अशी माहिती जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी दिली.
या भूमिपूजन कार्यक्रमाला जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,अहेरी पंचायत समितीचे सभापती सौ.सुरेखा आलाम,कमलापूरचे सरपंचा कु.रजनीता मडावी,सामाजिक कार्यकर्ता श्री.संतोष तटिकोंडावार,ग्रा.प.सदस्य महेश मडावी,सावित्री चिप्पावार,माजी सरपंच सुंदरशाही मडावी,बकया चौधरी,समया आलाम,बापू कडर्ल्लावार,राजना दैदावार,रामनया ओलेटीवार,हंनमतू चौधरी,प्रकाश दुर्गे,आदि उपस्थित होते.