आपला विदर्भ

छल्लेवाडा येथे नवीन वर्ग खोली बांधकामाचे जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

छल्लेवाडा येथे जि.प.शाळेत नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन सम्पन्न.
जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन
✒अहेरी पंचायात समिती अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय रेपनपली अंतर्गत येत असलेल्या सर्वात मोठे गाव छल्लेवाडा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा असून इयत्ता १ ते ८ वी पर्यंत शिक्षण असून २०० च्या जवळपास विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून वर्ग खोलीच्या कमतरता असून याकडे दुर्लक्ष केल्या जात होती.जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार व रेपनपली उमानूर क्षेत्राचे जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,व प.स.सदस्य श्री.भास्कर तलांडे यांनी गेल्या महिन्यात छल्लेवाडा गावाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली,त्यावेळी शाळा व्यवस्थापण समिती व पालकांनी जि.प.उपाध्यक्षकडे नवीन वर्ग खोलीची मागणी केली व गावातील सर्वांकडून वर्गणी गोळा करून नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी जाग घेणार असल्याची माहिती दिली होती,त्याचक्षणी जि.प.उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापण समितिचे पद्धधिकारी सदर जागेची पाहणी केली जाग सोईस्कर असल्याने जि.प.उपाध्यक्ष यांनी शा.व्य.स.व गावकर्याना शब्द दिली कि तुम्ही जाग निश्चित करा मि जिल्हा परिषदेच्या कोणत्याही निधीतून शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करू देऊ त्यानुसार. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच नवीन इमारत विध्यार्थाच्या शिक्षणासाठी उपलब्ध होईल.दिले शब्द पूर्ण केले.
आज सदर वर्ग खोलीचे भूमिपूजनाच्या कार्यक्रम सम्पन्न झाले असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम होते,तर उदघाटन म्हणून जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार होते यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री.सुनील आईचवार,गट समन्वयक प.स.अहेरीचे श्री.बूर्से,मुख्याध्यापक श्री.येलमुले सह शिक्षक श्री.मुरमाडे ,ग्राम पंचायत सदस्य श्री.सीताराम मडावी,शा.व्य.स.अध्यक्ष श्री.वसंत चव्हाण होते.
या भूमिपूजन कार्यक्रमाला वसंत गुरुनूले,व्येँकटस्वामी ठाकरे,नारायण कोटरंगे,नागेश गुरुनूले,हनुमंतू ठाकरे,प्रकाश सभावट,सेवा चव्हाण,तिरुपती धरबत,विलास सभावट,रणजीत सभावट,रामचंद्र झाडे,जगनाथ दुर्गे,रामचंद्र रामटेके,प्रवीण भगत,व्येंकटी दहागावकरसुधाकर दुर्गे,वैकुटम आकुदर,राजेश ठाकरे,रामकृष्ण लेंनगुरे,राजू लेंनगुरे,संतोष निकूरे व्येंकटी पोरतेट,श्रीनिवास लेंनगुरे,आदि उपस्थित होते…