आपला विदर्भ

पेंटींपाका ग्रा.पं. पोटनिवडणुकीत आविसं उमेदवार सपना दुर्गम बहुमताने विजयी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

पेंटींपाका ग्रा.पं. पोटनिवडणुकीत आविसं उमेदवार सपना दुर्गम बहुमताने विजयी*

*सिरोंचा* तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायतची एका जागेसाठी पोटनिवडणूक पेंटींपाका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडली. यात आविसंचे उमेदवार सपना राजमोगली दुर्गम ह्या बहुमताने निवडून येत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष बानय्या बेडके यांच्या दारुण पराभव केल्या.
आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात आविसचे ही निवडणूक लढविली.
आज तहसील कार्यालयात मतमोजणी घेण्यात आला.यात आविसं उमेदवार सपना राजमोगली दुर्गम यांना 143 मते तर भाजप उमेदवार बानय्या बेडके यांना 80 मते नोटा ला 8 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सपना राजमोगली दुर्गम ह्या विजयी झाल्याचे जाहीर केल्यानंतर आविस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर मिठाई वाटून व फटाके फोडून विजयोत्सव साजरा केले. सद्या परिस्तितीत पेंटींपाका ग्राम पंचायतीवर आविसची एकहाती सत्ता आहे.
आविस उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, आविस जेष्ठ नेते मंदा शंकर,मेडारम ग्राम पंचायत उपसरपंच वेंकनां ताल्ला, आविस तालुका अध्यक्ष बानय्या , आविस सल्लागार रवी सल्लम,पेंटींपाका ग्रा.पं. सरपंच गादे सोमय्या, सारय्या दुर्गम,वासू सपाट, राजमोगली दुर्गम,मधुकर मानेठी, तिरुपती बिरेल्ली, माणिकराऊतु मुतांय्या, संतोष कडारला, सडवली आकुंदरी, प्रवीण अजमेरा, सडवली येरय्या दुर्गम,वेंकटस्वामी दुर्गम,श्रीनिवास कुंमरी, तुळशीराम दुर्गम, महेंद्र कुंमरी, बापू बेडके, लक्ष्मीस्वामी जिमडे,जंपय्या मानेठी,रमेश जनगम, संतोष बिरेल्ली,राजकुमार दुर्गम, बापू जिमडे, पेंटय्या बेडके, राजमल्लू चिपल्ली, बापू दुर्गम,नागेश जाडी, श्रीनिवास दिकोंडा, तिरुपती दुर्गम, आदी आविस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.