आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथील युवा कार्यकर्त्यांची आविसं मध्ये प्रवेश

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*टेकडाताल्ला येथील युवा कार्यकर्त्यांच्या आविसं मध्ये प्रवेश*

*सिरोंचा*
सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला येथील युवा कार्यकर्त्यांनी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आञाम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आविसमध्ये प्रवेश केले.माजी आमदार दिपक दादा आञाम यांनी मागील आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या प्रभावित होऊन व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांच्या सपाटावर विश्वास ठेवत टेकडा ताल्ला येथील प्रशांत पेद्दी, गणेश मंडेला,आकाश गादे,किरण मंडेला,राजशेखर गणारापु ,साईकिरण आदी युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केले.
यावेळी माजी आमदार दीपक दादा आत्राम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
कार्यकर्त्यांच्या प्रवेश वेळी जाफराबाद ग्राम पंचायतचे उप सरपंच तिरुपती दुर्गम,आलापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके विजय रेपलवार, साई मंदा, जुलेख शेख, जुनेद शेख प्रकाश दुर्गे, प्रशात गोडशेलवार, सुधाकर कोरेत, संदिप बडगे आदि आविसचे पदाधिकरी उपस्थित होते