आपला विदर्भ

तमंदाला व मर्रीगुडम येथे सिमेंट कांक्रीट रस्त्याचे जि.प.सभापती जयसुधा जनागम यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

तमंदाला व मर्रीगुडम येथे सिमेंट कांक्रीट रस्ता बांधकामाचे जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांच्या हस्ते भूमिपूजन

*सिरोंचा*…तालुक्यातील मेडारम ग्राम पंचायत हद्दीतील तमंदाला व मर्रीगुडम या गावातील आदिवासी वस्तीत ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सिमेंट कांक्रीट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाल्याने या दोन्ही रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समितीचे सभापती जयसुधा बानय्या जनागम यांच्या हस्ते करण्यात आल्या.
स्वतःच्या मतदारसंघातील दोन्ही गावे असल्याने दोन्ही गावातील गावकऱ्यांच्या मागणीनुसार सभापतींनी स्वतः पाठपुरावा करून दोन्ही गावात पक्के रस्ते बांधकामासाठी पंधरा लाख रु.निधी मंजूर करवून आणल्या.जिल्हा परिषद सभापती जयसुधा जनागम यांच्या विकासात्मक कार्याबद्दल दोन्ही गावातील व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तामंदाला व मर्रीगुडम या गावातील सिमेंट कांक्रीट रस्त्याचं भूमिपूजन प्रसंगी मेडारम ग्राम पंचायत चे सरपंच शीवराज येरा ,उपसरपंच वेंकांना ताल्ला, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम, नागराजू इंगीली ,अशोक हरी,पोचम येरा,लक्ष्मण बोल्ले सह दोन्ही गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.