आपला विदर्भ

इंदाराम येथे बालिका विद्यालयात नवगत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम येथे प्रवेश उत्सव व नवोगतांचे स्वागत

इंदराम येतील बालिका विद्यालय येते नवोगत विद्यार्थ्याचे स्वागत तसेच राजश्री शाहु महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थीनींना वह्या-पुस्तके, लेखन साहित्य, स्कूल बैग, बाटल, सोपकेस,बकेट, मग, चिमटा, ब्रश, इ. दैनंदिन निवासी उपयोगी वस्तुंचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरनीय श्री अजयभाऊ कंकडालवार, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती जि.प. गडचिरोली, प्रमुख अतिथी सन्मा. एन.डब्लु.वैद्य, गट शिक्षणाधिकारी पं.स.अहेरी, मुख्याध्यापिका कु. डी.वाय.ढवस, इ. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पालक, विद्यार्थीनी, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन मा.विनोद राऊत तर आभार प्रदर्शन मा.सुभाष कावळे यांनी केले.