आपला विदर्भ

जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त टेकडा ताल्ला येथे रुग्णांना फळवाटप व वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आविस चे विदर्भ सल्लागार अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस काल जिल्ह्यात सगळीकडे मोठ्या उत्साहात पार पडला.

टेकडा ताल्ला येथील आविस कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप केले. तसेच आरोग्य केंद्र परिसरात वृक्षरोपण ही केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन मडावी,औषधी संयोजक कृष्णा वेलदंडी, साईकुमार मंदा, स्वप्नील पेद्दी,पुनम दुर्गम, बापू बारसागडे, प्रशांत पेद्दी,साईकिरण मंडेला,गणेश मंडेला,राजू राजरापू,योगेश मंडेला,वेंकटेश गादे,सागर आरे आदी उपस्तीत होते.