आपला विदर्भ

नियमावली ठरवून व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या… कुणालभाऊ पेंदोरकर

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..

नियमावली ठरवून व्यवसायीकांना दुकाने सुरु करण्याची परवानगी द्या. युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी

विदर्भक्रांती ऑनलाईन पोर्टल न्युज
( मुख्य संपादक रवी सल्लम सिरोंचा )

राज्यातील अनेक जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव आढूळून आला असला तरी राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकही कोरोना रुग्ण आढूळून आलेला नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे लॉकडाउनच्या काळात प्रशासनाने योग्य ती खरबरदारी व उपयोजना केलेल्यामुळेच जिल्हा कोरोना मुक्त आहे.
लॉकडावूनच्या काळात जीवनावश्यक वस्तूची दुकानें वगळता चायटपरी पासून इतर साहित्य विक्रीची दुकाने मागील दीड- दोन महिण्यापासून बंद आहेत. त्यामुळे रोजीरोटी करून कुटुंबाची उदरनिर्वाह करणारे छोटे दुकानदार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. रोजगार बंद असल्याने गोरगरीब व्यावसायीकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नियमावली ठरवून जिल्ह्यातील छोट्या – मोठया व्यावसायीकांना दुकानें सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *