आपला विदर्भ

तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस सिरोंचा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत खरेदी करण्यात यावी..रवी सल्लम यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस सिरोंचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत खरेदी करण्यात यावी आविसं सल्लागार रवी सल्लम यांची सरकारकडे मागणी

सिरोंचा…सिरोंचा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पांढर सोनं कोणत्या खरेदी केंद्रावर विकाव अशी विवंचनेत सापडले असल्याने या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत खरेदी करण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार रवी सल्लम यांनी सरकारला केली आहे.
सिरोंचा तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस पीक काढत असतात. या तालुक्यातील शेतकरी कापूस हे दरवर्षी तेलंगणातल्या चेंनूर व कोय्युर ला विक्री करत होते. हे दोन्ही सेंटर सिरोंचाला जवळ पडत होते.परंतु यावर्षी कोरोना मुळे तेलंगणा सीमाबंद असल्याने शेतकऱ्यांना आपली कापूस तेलंगणात विकता आले नाही.आजही तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांची कापूस घरांमध्ये पडून आहे. वेळेवर कापूस विकता न आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटा पाठोपाठ मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या जून महिनापासून पावसाळा हंगाम सुरू होत असल्याने पावसांमुळे जर घरात साठवून ठेवलेल्या कापूस बिजल्यास प्रत्येक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मजुरांना मजुरी देण्यासाठी काही दलालांना अल्पदरातच का होईना पण फक्त दहा टक्केच कापूस विकले असून उर्वरित नव्वद टक्के कापूस शेतकऱ्यांनी आपआपल्या घरी साठवणूक करून ठेवले. बँकेकडून कर्ज घेऊन व खाजगी कर्ज घेऊन शेतकरी कापूस उत्पादन करीत असतात.परंतु वेळेवर कापूस विकता न आल्याने कर्ज कसे फेडायचे असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने कापूस विकण्यासाठी अनखोडा,चामोर्शी व गोंडपीपरी येथील केंद्रावर जावं लागतं असून तिन्ही ठिकाण सिरोंचा पासून शंभर ते दीडशे किलो मीटरचे लांब अंतरावर असल्याने यात शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होत आहे. सिरोंचा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत असून या बाजार समितीकडे गोदाम ही आहे. जर सरकारने निर्देश देऊन या बाजार समितीमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी केल्यास शेतकऱ्यांना कापसाला योग्य भाव मिळणार व दलालांकडून होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूकही होणार नाही. यावर सरकार व जिल्हा प्रशासन लवकरात लवकर तोडगा काढून तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस सिरोंचा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत खरेदी करण्यासाठी तात्काळ आवश्यक निर्देश देण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *