आपला विदर्भ

जिल्ह्यात मिठाचा तुटवडा नाही – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली

जिल्ह्यात मीठाचा तुटवडा नाही : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

अफवांवर विश्वास ठेवून जास्तीचे मीठ खरेदी करू नका

गडचिरोली: जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मिठाचा तुटवडा असल्याची चुकीची अफवा पसरली असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नसून मोठ्या प्रमाणात मीठ साठा आपल्याकडे उपलब्ध आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले आहे.

कुरखेडा व धानोरा तालुक्यांमध्ये काही लोकांकडून चुकीची अफवा पसरवण्यात आली असून जिल्ह्यांमध्ये मुबलक स्वरूपात मीठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जास्तीचे पैसे देऊन मीठ खरेदी करू नये. अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी मीठ खरेदी केल्यामुळे संबंधित तालुक्यात मीठ संपल्याचे समोर आले आहे. मात्र जिल्ह्यात मीठाचा मुबलक साठा असून अकारण मीठ खरेदी करून साठा करू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
दुकानदारांनीही याबाबत आवश्यक काळजी घेऊन ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये तसेच याबाबत येणाऱ्या ग्राहकांना ही खरी माहिती द्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. अचानक वाढलेली मागणी व बाजारपेठेतील मिठाची झालेली कृत्रिम टंचाई याबाबत प्रशासनाने दखल घेऊन नागरिकांना आवाहन केली आहे की प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. कोणतीही अफवा असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा आणि त्याबाबत खात्री करून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *