आपला विदर्भ

ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा….संदीप राचर्लावार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा

तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करा-संदिप राचर्लावार सिरोंचा- तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे तिन-तेरा ममवाजले असुन तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग व इतर नागरिकांना लहान-लहान किमासाठी सिरोंचा शहर मुख्यालयी यावे लागत आहे.सध्या सर्वञ लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने शासनाने तलाठी व ग्रामसेवक यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती केली आहे. गडचिरोली जिल्हा ग्रिन झोन म्हणून जाहीर केले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती केली आहे. पण हे कर्मचारी नेमुन दिलेल्या ठिकाणी न राहता संपूर्ण कारोबार सिरोंचा शहर मुख्यालयी राहुन करित असल्याने ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य संदीप राचर्लावार यांनी शासनाकडे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याचा ग्रामसभेमध्ये ठराव घेणे बंधनकारक केले असुनही या परिपत्रकाला हे कर्मचारी केराची टोपली दाखवत आहे. तलाठी व ग्रामसेवक त्यांच्यावर ग्रामीण भागाचा विकासाचा कणा अवलंबून असतो. पण सध्या हेच कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला नहागच त्रास देत आहे. यामुळे ग्रामविकासाचा खेळखंडोबा झाला आहे. ग्रामीण भागातील या कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची एलर्जी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची कामे वेळेवर होत नसल्याची ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे. अगोदरच ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत भाडे पावती व करार पत्रक जोडणे बंधनकारक होते. पण त्यातही हे कर्मचारी आपली अक्कल लढवून खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे भत्ता उचल करीत आहे. संबंधित विभागाकडे तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. ग्रामसेवक ,आरोग्य सेवक, तलाठी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहाणे शासनाने बंधन कारक केले आहे. असून सुद्धा बऱ्याच वेळा संबंधित कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखला जोडून मी मुख्यालयी राहत असल्याची परस्पर सिद्ध करण्याचे प्रयत्न करत असतात. मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे पंचायतराज समितीने वर्ष 2017-18 तेरावी महाराष्ट्र विधानसभा चौथा अनुपालन अहवाल द्वारे शासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ग्रामसेवक, तलाठी व आरोग्य सहाय्यक मुख्यालयी राहत असल्या संबंधी, संबंधित ग्रामपंचायतींचा ग्रामसभेचा ठरावा आवश्यक केले आहे‌, असे शासनाचे परिपत्रक दिनांक 9 सप्टेंबर 2019 काढलेली असून या परिपत्रकामुळे ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येते आहे. मात्र असे असतानाही ग्रामीण भागातील कर्मचारी मुख्यालयात न राहता शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सध्याची परिस्थिती बघता शासनाने व प्रशासनाने या बाबतीत दखल घेऊन तलाठी व ग्रामसेवक तसेच आरोग्य सेवक यांना मुख्यालयी राहुन सेवा देण्यासाठी सक्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष तथा सिरोंचा नगरपंचायत चे नगरसेवक संदीप राचर्लावार यांनी वरिष्ठांन कडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *