आपला विदर्भ

सिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…….

सिरोंचा तालुका प्रतिनिधी …

सिरोंचा तालुक्यात रोजगार हमीचे कामे प्रगतीपथावर. सिरोंचा- पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत सध्याच्या लाॅकडाऊन व संचारबंदी चा कालावधी बघता तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व हेतकरू तसेच इतर गरीब बांधवांना हातास काम नसल्यामुळे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण तालुक्यांतील 39 ग्रामपंचायती अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदान अनुसार तालुक्यात इंदिरा आवास योजना घरकुल बांधकाम व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बारा मदगी कामे तसेच वनविभागांतर्गत एकूण 177 कामे सुरू केलेले असून या कामावरील प्रत्येक मजुरास प्रति दिवस 268 रुपये प्रमाणे दैनंदिन मजुरी देण्यात येत आहे. तालुक्यातील 39 ग्रामपंचायती अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे या सर्व ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 1301 असे विविध प्रकारचे कामे सध्या ग्रामपंचायत अंतर्गत सुरू आहेत. सदरची कामे जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येत असून 39 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या 100% प्रतिसादामुळे कोणत्याही कामात अजिबात खंड न पडतात ही सर्व कामे सध्या प्रगतीपथावर असल्याची माहितीही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी दिली आहे. सध्या तालुक्यातील विविध ग्रामपंचायती अंतर्गत 1300 कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत उपलब्ध करून दिली आहेत. सदर कामाचा आढावा स्वतः गटविकास अधिकारी हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा वेळोवेळी घेत आहेत. गटविकास अधिकारी उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी मनोज पडीशालवार, राकेश गणपुरपू, नागेश सेनीगारपु, अष्टशील कांबळे, डाटा ऑपरेटर नरेश दासरी, देविदास चव्हाण तसेच सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक व रोजगार सेवक आपले काम योग्यरीत्या पार पडत असुन मजुरांना कामाच्या ठिकाणी सेनेटराईज, मास्क, हँडवॉशचे पाणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. सोबतच कामावरील मजुरांना कोवीड-19 बाबत वेळो-वेळी मार्गदर्शन सुद्धा करण्यात येत असून प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कामाच्या ठिकाणी मजुरां करीता प्रथम उपचार पेटीची व्यवस्था सुद्धा सर्वच ठिकाणी करून देण्यात आली असल्याची माहिती गट विकास अधिकारी पंचायत समिती सिरोंचाचे कुणाल उंदीरवाडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *