आपला विदर्भ

माजी आमदार दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते तथा अहेरी विधानसभेचे माजी आमदार श्री.मा.दिपकदादा आत्राम तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप

अहेरी : कोरोना covid-१९ विषाणू चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात सुरू आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने लाकडाऊन सुरू केला असून कुणीही बाहेर न पडता घरी राहण्याची विनंती केली जात आहे. यामुळे अनेक लोकांचे उदरनिर्वाह साधन बंद झाले असल्याने माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून अहेरी तालुक्यातील ग्रा.प.गुड्डीगुडम मधील अत्यंत गरजू व निराधार कुटूंबाना 5 kg तांदूळ,अर्धा kg तुरीची दाळ, मिरची व हळद पावडर,तेल पॉकेट,मीट पॉकेट आदी अन्नधान्य साहित्य किट स्वरूपात वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम ,सरपंच गुलाबराव सोयम,उपसरपंच वैभवभाऊ कांकडालवार,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,लक्षण आत्राम आदी उपस्तीत होते.,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *