आपला विदर्भ

तालुका स्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका

तालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार मका*जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची जिल्हाधिकाऱ्यां सोबत झालेल्या चर्चेत निघाला तोडगा* *मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा*

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क... अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील मका पीक तालुकास्तरावर आदिवासी विकास मंडळ खरेदी करणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली. अहेरी विधानसभा क्षेत्रात पाच ही तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात मकाचे उत्पादन करीत असतात.शेतकऱ्यांना आवश्यक असे बाजारपेठ व खरेदी केंद्र नसल्याने मका उत्पादक शेतकरी अनेक समस्यांना सामोरे जात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटून यावर तोडगा काढण्याची विनंती केले होते. शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यावर दखल घेत जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्यासोबत चर्चा करून यात तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचे व तालुका स्तरावर मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे विनंती केले. यावर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदिवासी विकास मंडळाचे संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी,मूलचेरा,भामरागड,एटापल्ली व सिरोंचा या पाच ही तालुक्यात तालुका मुख्यालयी मका खरेदी करण्याचे निर्देश दिले. तालुका स्तरावर मका खरेदी केंद्र सुरू झाल्यास याची फायदा मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *