आपला विदर्भ

सिरोंचा तालुक्यातील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट सेवा ठरली कुचकामी !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा तालुक्यात इंटरनेट सेवा नावापुरतीच राहील का? सिरोंचा-सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असुन सध्या नागरिकांची प्रतेक कामे बदलत्या काळानुसार आता आॅनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने आता कोणतेही शासकिय व अशासकीय कामा साठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची पाळी आली आली असुन हि कामे करायची म्हटले तर इंटरनेट सेवा उपलब्ध असने अतिशय गरजेचे आहे.त्या शिवाय शासकीय , निमशासकीय कार्यालयातील कामे होऊ शकत नाही.माञ असे असतानाही सिरोंचा तालुक्यातील संपूर्ण भारतीय दुरसंचार ची एक मेव मोबाईल इंटरनेट सेवा सध्या संपूर्ण तालुक्यात मागिल अनेक दिवसांपासून योग्य सेवेच्या अभावामुळे कुचकामी ठरत चालली आहे.हि सेवा सध्या तालुक्यातील मोबाईल फोन धारकांनाकरिता फार मोठी डोके दुखी ठरू लागली आहे.तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल मनोरा तर नुसते नावापुरतीच राहील की काय असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांनी महागडे मोबाईल फोन खरेदी करून आॅनलाईन पध्दतीने शिक्षण व ईतरञ क्षेञातील तसेच देश व जागतिक पातळीवर घडनाऱ्या घडामोडी तत्काळ मोबाईलच्या माध्यमातून जानुन घेण्यासाठी मोबाईल धारक महीन्या काठी महागाडे नेट पॅक रिचार्ज करून घेत असता या मुळे भारतीय दुरसंचार कंपनीला फार मोठ्या प्रमाणात महसूल महिण्याकाठी प्राप्त होत असताना दुरसंचार सेवा हवी त्या प्रमाणात स्मार्ट मोबाईल फोन धारकांना देत नसल्यामुळे मोबाईल फोन धारकांना मधे दुरसंचार सेवे बाबतीत संतापाची लाट उसळली आहे.असे असताना सुद्धा भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड सेवा माञ दिवसे -दिवस माला-माल तर दुसरीकडे ग्राहक माञ कंगाल होत असल्याचे दिसून येत आहे.सुरवातीला काही वर्षा पूर्वी तालुक्यातील अनेक ठिकाणी भ्रमणध्वनी सेवा उपलब्ध होण्या आधी टेलिफोन सेवा उपलब्ध करून दिली होती. माञ कालांतराने याची जागा आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे टेलीफोन ची जागा भ्रमणध्वनीने काही वर्षा आगोदर घेतल्यानंतर पुढील काही महिन्यातच टेलिफोन सेवा इतिहास जमा होऊन बसली ती कायम स्वरुपी सध्या ईटरनेटचे युग असल्याने बदलत्या काळानुसार त्यात दिवसेन-दिवस फार मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत.नेटसेवा सुरू होण्या अगोदर कोणत्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयातील व नोकरी संदर्भात कामाकरीता रितसर अर्ज टपाल ने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन द्यावे लागत होते. माञ आता हेच काम स्मार्ट मोबाईल फोनवर होत आहे.शासकिय कार्यालय असो कि बॉऺंक व्यवहार देवान घेवाण करण्यासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध असल्याने आॅनलाईन पध्दतीने व्यवहार होत आहे.सध्या स्मार्ट फोन वरच पे- टियम, ई-मेल,ई- शिक्षण, ई-आरोग्य, व्हीडिओ काॅलिंग, कार्यालयीन कामे असो कि व्हाइटसप व ऑनलाईन व्यवहार तसेच इतर व्यवहार हि करताना इंटरनेट सेवा उपलब्ध असने अतिशय गरजेचे असते माञ तालुक्यातील इंटरनेट सेवा उपलब्ध असुनही ती कासव गतीने सुरू असलेल्याने 3 जी सेवा नुसते नावापुरतीच राहील आहे.सध्या संपूर्ण देशात 4 जी ची वाटचाल सुरू असताना तालुक्यातील दुरसंचार सेवा माञ 3 जी वरच अडकून पडली आहे.तालुक्यात हि 3 जी सेवा माञ नावालाच असुन सेवा माञ 1 जीबीची सुद्धा देत नाही.त्या मुळे भ्रमणध्वनी धारकांना महिन्या काठी टाकलेले नेट व्हाउचर उपयोगी पडत नसल्याने तालुक्यातील नागरिकांना नाहागच मनसथाप सहन करावा लागत आहे.ते खाजगी मोबाईल सेवा उपलब्ध नसल्यामुळे सध्या दुरसंचार सेवा योग्य रितीने उपलब्ध होत नसले तरी सिरोंचा तालुक्यातील जनतेला ह्या एक मेव भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड कंपनीच्या सेवेवरच अवलंबून रहावे लागत आहे.या मधे सुधारणा व्हावी या बाबतीत नागरिकांनी अनेक वर्षांपासून वेळो -वेळी आंदोलन व निवेदन देण्यात येवुन सुद्धा या मधे आजही कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नसल्यामुळे आता तरी या बाबतीत चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेञाच्या खासदारांनी या समस्याकडे लक्ष देवून हि समस्या कायम स्वरुपी दुर करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरीत सुचना देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी खासदार तसेच केंद्रीय दूरसंचार मंत्रीकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *