आपला विदर्भ

आदिवासी विद्यार्थी संघाचं प्रयत्नाने मृत महिलेचा शव पोहोचला घरी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….आदिवासी विद्यार्थी संघाच्या प्रयत्नाने गोलाकर्जी येथील मृत महिलाच्या शव पोहचला घरी
◼️जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकार व आर्थिक मदत,
🔸अहेरी तालुक्यांतील गोलाकर्जी येतील महिला बोँदुबाई विठ्ल मडावी वय ६० वर्ष हि एका आठवड्यापासून आजारी होती,सदर महिलेला उपचारांसाठी अहेरी येतील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते,मात्र प्रक्रुती ठिक झाले नसल्याने अहेरी येथून जिल्हा रुग्णालय गडचिरोली येते रेफर करण्यात आले होते,मात्र बुधवारी सदर महिला मय्यत झाली होती.पण सम्पूर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने सदर महिलांचे कोरोना तपासणीसाठी नमुना अहवाल पाठवण्यात आले होते.काल सायंकाळी सदर महिलेच्या तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सदर महिला कोरोना निगेटीव होती.
सदर महिलाच्या डेथ बाडी पाच दिवसापासून गडचिरोली येतील रूग्णालयात होते,व गाडी उपलब्ध नव्हती अशावेळी काय करावे हे नातेवाईकांना कळत नव्हता,
सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे स्थानिक कार्यकर्त्याना माहिती मिळाली स्थानिक कार्यकर्ते ग्राम पंचायत सदस्य श्री.सुधाकर आत्राम,माधव कूळमेथे यांनी सदर बाब भ्रमणध्वनी वरून अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांना माहिती दिली.
यांना माहिती होतच सदर मय्यत महिलेच्या आपभिती तलांडे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्या कानी टाकले असता आज सकाळी सदर महिलेच्या म्रुत्यूदेह गडचिरोली वरून गोलाकर्जी आण्यांसाठी स्वखर्चातून गाडीची व्यवस्था व आर्थिक मदत आदिवासी विध्यार्थी संघाचे कार्यकर्ते श्री.शिवराम पूल्लूरी व मिथुन देवगडे,यांना रूग्णालयात पाठवून शव गोलाकर्जी पाठवण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *