आपला विदर्भ

आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटस वाटप

कोविड 19 मुळे संपूर्ण देशासह राज्यात ही लॉक डाऊन लागू केल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब व मजुरांना मजुरी मिळत नसल्याने त्यांना जीवन जगणे कठीण होत चालला आहे.
या परिस्थितीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची गरज असून अहेरी विधान सभेचे माजी आमदार दीपक दादा आत्राम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे मार्गदर्शनाखाली आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वेंकटापूर गावातील 138 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
यावेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,ग्रामसेवक रंजित राठोड,प्रतिष्ठित नागरिक रघुनंदन आरवेलल्लीवार,माजी ग्राम पंचायत सदस्य अजय आत्राम,प्रतिष्ठित नागरिक , श्रीनिवास घोडाम,तुळसीराम गुरूनूले,श्रीनिवास दुर्गम,मधुकर रत्नागिरी आदी उपस्थित होते.आविसच्या या मदत कार्याबद्दल व्येंकटापूर येथील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *