आपला विदर्भ

आदिवासी विद्यार्थी संघाकडून व्येंकटापूर येथील मृतक सुनील मांदाळे कुटुंबियांना आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा :-
तालुक्यातील वेंकटापूर येथील आदिवासी विध्यार्थी संघटनेचे कार्यकर्ता सुनील मंदाळे यांच्या दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
वेंकटापूर येथील सुनील मंदाळेच्या मृत्यूची बातमी कळताच आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी तात्काळ वेंकटापुरला पोहचून मंदाळे कुटुंबाची सांत्वन करून तेरवीच्या कार्यक्रमाला आर्थिक मदत केले आहे.
यावेळी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,प्रतिष्ठित नागरिक रघुनंदन आरवेल्लीवार,ग्राम सेवक रंजित राठोड,अजय आत्राम,तिरुपती चिटयाला,श्रीनिवास घोडामसह वेंकटापूर येथील अविसचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *