आपला विदर्भ

समाजकल्याण समाजोन्नती अन्याय ,भ्रष्टाचार निवारण समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी संतोष ताटीकोंडावार यांची निवड

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……

समाजकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्या जिल्हा अध्यक्ष पदी संतोष ताटीकोंडावार यांची निवड
देशभरात दिवसेंदिवस भ्रष्टाचार अन्याय अत्याचार या सारख्या समाज विरोधी समस्या फोफावत चालल्या आहेत. अन्याय अत्याचार भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याकरिता तसेच सरकारी योजना गोर गरीब जनते पर्यंत तसेच्या तसे पोचविण्यासाठी तसेच समता मुलक समाज निमिर्ती मा. डी. व्ही. गवई साहेबांनी निर्माण केलेल्या भ्रष्ट्राचार निवारण समिती महाराष्ट्र द्वारे समाजकल्याणाचे काम केले जाते. संतोष ताटीकोंडावार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समितीचे राष्टीय अध्यक्ष डी. व्ही. गवई साहेब यांनी ताटीकोंडावार यांची गडचिरोली जिल्हा अध्यक्ष म्हणून आज नियुक्ती केली आहे. त्यासाठी संतोष तातीकोंडावार यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. जनकल्याण समाजातील अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती, महाराष्ट्राला असलेल्या अधिकाराचा वापर जनकल्याणासाठी अन्यायाच्या विरोधात तसेच भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हातभार लावण्याचे काम भ्रष्टाचार निवारण समितीच्या माध्यमातून आपल्याला करायचे असून भ्रष्टाचार मुक्त देश घडविण्याचा उद्देश या सामितीचा आहे. म्हणून जिल्हा अध्यक्ष या नात्याने माझा जिल्हातील युवकांना आव्हाहन आहे की, पुढे या समितीचे सभासद व्हा समितीचा जिल्हा ,शहर , तालुका व ग्रामीण भागात प्रत्येक लोकांपर्यंत समितिचा प्रचार करून आपल्या लोकांना जागृत करा. व पुढे येऊन भ्रष्टाचार विरोधात लढा द्या असे आवाहन नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *