आपला विदर्भ

रेगुंठा येथे उद्यापासून धान खरेदी केंद्र सुरू होणार …जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचं पुढाकार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी रेगुंठा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मागणीसाठी काल जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांची भेट घेऊन मागणी केले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे फोन करून रेगुंठा येथे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. धान खरेदी केंद्र सुरू केल्यास धान साठवणुकीसाठी आवश्यक गोदाम उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.यावर जिल्हा परिषदेचा अध्यक्षांनी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता त्यांनी धान साठवणुकीसाठी जिल्हा परिषदेचे दोन शाळांचे परिसर व वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी माहिती दिले.

यामुळे रेगुंठा परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या मार्गी लागणार असून येत्या एक दोन दिवसात रेगुंठा येथे धान खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *