आपला विदर्भ

तेलंगणातील मंचीऱ्याल ते सिरोंचा व्हाया वरंगल पर्यंत नवीन रेल्वे लाईनला मंजूरी मिळवून देण्याची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

तेलंगणातील मंचीऱ्याल ते सिरोंचा व्हाया वरंगल पर्यंत नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळवून देण्याची मागणी *नवीन रेल्वे लाईन मंजुरीसाठी खासदार अशोक नेते यांना आविसं कडून निवेदन सादर*

सिरोंचा…केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा करून तेलंगणातील मंचीऱ्याल ते सिरोंचा व्हाया वरंगल पर्यंत नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळवून देण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाकडून गडचिरोली चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे शासकीय दौऱ्यावर मंगळवारी सिरोंचाले आले असता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्राम गृहात त्यांची आविस पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सिरोंचा शहरापर्यंत रेल्वे जाळे पसरविण्याबाबत सकारात्मक चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. खासदार अशोक नेते यांना दिलेल्या निवेदनात, सिरोंचा हे तालुका शंभर टक्के तेलगू भाषिकांची असून या तालुक्याची आज पर्यंत पाहिजे त्या प्रमाणात सर्वांगीण विकास झालेल नसून तालुक्यात एक ही उधोगधंदे नसल्याने रोजगाराअभावी दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. तालुक्यातील नागरिकांची पूर्वीपासूनच रोटी बेटी व्यवहारासह आरोग्य, उधोग,दळणवळणासह अन्य संबंध तेलंगणासोबत असल्याने जनतेची अगदी जवळीक तेलंगणाशी आहे. तालुक्यातील बहुतेक नागरिक हे मंचीऱ्याल जाऊन बल्लारशाह ,चंद्रपूर, नागपूर व मुबईचे प्रवास हे रेल्वे ने करीत असतात तसेच हैद्राबाद सह आंध्रप्रदेश ला जाण्यासाठी वरंगल ला जाऊन रेल्वेने प्रवास करीत असतात. सिरोंचा तालुक्यातील वाढती बेरोजगारीवर मात करण्यासाठी तसेच अविकसित तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सिरोंचा शहरापर्यंत रेल्वे जाळे पासरविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तेलंगणातील वरंगल व मंचीऱ्याल या जिल्ह्याचे दक्षिण ग्रामीण भाग ही रेल्वे लाईन पासून आज ही वंचित असून दोन्ही जिल्ह्याचे ग्रामीण भाग हे सिरोंचा शहराला लागून आहे. तेलंगणातील मंचीऱ्याल ते सिरोंचा व्हाया वरंगल चे अंतर फक्त 180 की मी .पर्यंत असून या भागात रेल्वे जाळे पसरावल्यास महाराष्ट्रातील सिरोंचा सह तेलंगणा चे वरंगल व मांचीऱ्याल या दोन्ही जिल्ह्याचे संपूर्ण ग्रामीण भाग रेल्वेनं जुळल्यास जलदगतीने विकास होण्याची ही नाकारता येत नाही. खासदार अशोक नेते यांना आविस चे सल्लागार रवी सल्लम यांनी रेल्वे लाईन मंजुरीबाबत निवेदन दिले. यावेळी सिरोंचा येथील प्रतिष्टीत नागरिक भास्कर आनकरी,राजांना मारगोनी उपस्तीत होते. खासदार अशोक नेते हे निवेदन स्विकारताना त्यांचा सोबत भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रविभाऊ ओल्लालवार, दामोधर अरिगेलावार, सत्यनारायण मंचालवार,डॉ.भरत खटी, संदीप कोरेत, शंकर नरहरी,कलाम हुसेन, माधव कासार्ला,जावेद भाई आदी उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *