आपला विदर्भ

अहेरी /देवलमर्री ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेकडून जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी/देवलमर्री ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेकडून जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर *कोरोना संकटात अडकलेल्या ऑटो चालक मालकांना राज्य सरकार कडून दहा हजार रु.ची आर्थिक मदत करण्याची मागणी*

अहेरी….. अहेरी व देवलंमर्री येथील ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन मागील तीन महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गामुळे ऑटो रिक्षा चालक व मालकांसमोर उपासमारीची वेळ आली असून राज्य सरकारकडून प्रत्येक ऑटो रिक्षा चालकांना व मालकांना कुटुंब उदरनिर्वाहासाठी दहा हजर रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात , यापूर्वीसुद्धा संघटनेकडून राज्याचे मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे ऑटो रिक्षा चालक व मालकांचे व्यथा मांडण्यात आल होता. परंतु अद्याप राज्याचे मुख्यमंत्र्यांनी कोणतेही सहकार्य केले नाही.आतातरी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ऑटो रिक्षा चालकांचे समस्या जाणून घेत ऑटो रिक्षा चालकांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदतीसह कर्ज घेऊन ऑटो रिक्षा घेतलेल्या मालकांची कर्जाचे रकमेवरील संपूर्ण व्याज माफ करण्यात यावी तसेच राज्य सरकारकडून ऑटो रिक्षा चालक व मालकांची विमा काढण्यात यावी असेही मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र गर्गम, उपाध्यक्ष रंगय्या बतुलवार, कोषाध्यक्ष विशाल दुर्गे याचसोबत सविस्तर चर्चा करून निवेदन तात्काळ मुख्यमंत्र्यांना पाठवून ऑटो रिक्षा चालक व मालकाची समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *