आपला विदर्भ

अहेरी पंचायत समितीत जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची आढावा सभा संपन्न

*अहेरी पंचायत समितिमध्ये कोरोना-19 बाबत आढावा सभा सम्पन्न **
🔸 *जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली आढावा **
▪अहेरी :-अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्राम पंचायतचे सचिव,प्रशासक व पंचायत समितीचे विभाग प्रमुख व आरोग्य विभाग यांच्या आढावा सभा आयोजित करण्यात आली. सदर सभेला जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा सम्पन्न झाला. सदर सभेत कोरोना -19 बाबत आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी श्री.किरण वानखेडे यांनी माहिती दिली.त्यानंतर कॄषी विभाग,घरकुल विभाग,शिक्षण विभाग,बांधकाम विभाग,आदि बाबत आढावा घेण्यात आली असून तालुका अंतर्गत ग्राम पंचायतीचे सचिव व प्रशासक यांचे कडून ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असणारे विविध कामांचे आढावा घेतले.
या आढावा सभेला पंचायत समिति सभापती श्री.भास्कर तलांडे, उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,प.स.सदस्या सौ. सुरेखा आलाम,व पंचायत समितिचे संवर्ग विकास अधिकारी श्री.बी.गडधे,होते.
यावेळी ग्राम पंचायतीचे सचिव व प्रशासक यांनी उपस्थित राहून माहिती दिले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *