Uncategorized

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित समस्या सोडवण्याची म.रा.प्रा.शि.समितीची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

शिक्षकांचे प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडलावार याना निवेदन सादर

■ गेल्या अनेकवर्षांपासून शिक्षकांचे समस्या प्रलंबित

■ प्रलंबित समस्या सोडविण्यात यावी म्हणून निवेदन सादर

गडचिरोली
गडचिरोली जिल्हा हा जंगलव्याप्त आणि भौगोलिक दृष्टीने पाहायला गेले तर अनेक गावे दुरदूरवर आहेत.या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळे आहेत.या दृष्टीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचे अनेक समस्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्याचा भौगोलिक परिस्थितीत विचार करून जिल्ह्यातील कमी पट संख्या असलेल्या शाळे बंद करू नये,सेवा निरवृत्तीचा दिवशी सेवा निरवृत्तीधारकला सर्व लाभ देऊन सेवा निरवृत्ती देण्यात यावे,गडचिरोली जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांना चाटोउपाध्याय आयोगाच्या शिपाराशीनुसार वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा पदोन्नती एक स्तर वेतनश्रेणी सूरु ठेवण्यास विकल्प मुभा देण्यात यावी,उच्चश्रेणी मुख्यध्यापकांची रिक्त पदे पदावनात मुख्यध्यापकामधून भरण्यात यावी,15 % प्रोत्साहन भत्ता थकबाकी रक्कम अदा करण्यात यावे,चौदावे वित्ता आयोग अंतर्गत शाळांना सोई सुविधा पुरविणे अंतर्गत 20 टक्के राखीव रक्कम देण्यासाठीजिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीना निर्देशित करण्यात यावे,वैधकीय प्रतिपूर्ती देयके नियत कालावधीत मंजूर करण्यात यावी.असे विविध प्रकारचे 23 प्रलंबित समस्यांचा निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती शाखा-गडचिरोलीच्या वतीने आज जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलावार याना निवेदन सादर केले आहे.सदर निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलावार घेतले असून सोबत जिल्हा परिषद सदस्य अँड राम मेश्राम उपस्थित होते. जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रलंबित समस्या शासन दरबारी मांडून समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष व पदाधिकारीना दिले आहेत.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष धनपाल मिसार,उपाध्यक्ष नरेश कोत्तावार,सरचिटणीस रमेश रामटेके,कोषअध्यक्ष गणेश कटेंगे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *