आपला विदर्भ

इंदारम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पूर्व शाळा तयार सभा संपन्न

इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिक विद्यालयात पूर्व शाळा तयार सभा संपन्न

■ इयत्ता 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तक वाटप.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी:- येथून जवळच असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आज पूर्व शाळा तयारी सभेची आयोजित करण्यात आली.
या पूर्व शाळा तयारी सभेचे अध्यक्ष म्हणून अहेरीचे तहसीलदार ओमकार ओतारी हे होते.मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद गडचिरोलीचे अध्यक्ष अजयभाऊ कांकडलावार होते.प्रमुख अतिथी म्हणून सरपंच गुलाबराव सोयाम होते.प्रमुख पाहुणे म्हणून वैधकीय अधीक्षक डॉ लाडस्कार,पोलीस पाटील दुर्गे,आरोग्य सेविका दुर्गे,शिक्षक भुरसे,के.जी.बी.चे मुख्याध्यापिका दीपिका ढवस ही होत्या.
करोनामुळे या वर्षी विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलावार यांनी पुढाकार घेऊन आज पूर्व शाळा तयारी सभा घेऊन केजीबी विध्यालायतील विद्यार्थिनींना शिक्षण कसे देता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आणि वर्ग 9,10 वीच्या बालिकाना तहसीलदार व जि.प.अध्यक्ष कांकडलावार यांचे हस्ते मोफत पुस्तक वाटप करण्यात आले.
या पुर्व शाळा तयारी सभेला इंदाराम परिसरातील नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *