आपला विदर्भ

इंदारम येथील जि.प.शाळेत दोन नवीन वर्गखोल्यांचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

इंदाराम येथील जि.प. शाळेत दोन नवीन वर्ग खोल्यांचे उदघाटन
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन
📝जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत इंदाराम येथे जिल्हा परिषद शाळा असून या शाळेत इयत्ता १ली ते सातवीं पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार* यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०१८-१९ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी तून दोन नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या बांधकाम पूर्ण पणे झाले असल्याने आज श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली.
असून सदर उदघाटनला जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,इंदारामचे सरपंच श्री.गुलाबराव सोयाम,उपसरपंच श्री.वैभव कंकडालवार,शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.प्रकाश पेंदाम,उपाध्यक्ष श्री.आनंदराव गोसमूल,पोलीस पाटील श्री.सदाशिव दुर्गे,वसंत मेश्राम,शिवमं आलाम,देवलमरीचे उपसरपंच श्री.जगनाथ मडावी,श्रीनिवास राऊत,जबीर शेख,व्येंकटेश औतकर,लक्ष्मण दुर्गे,सुरेश कोत्तवडलावार,सौ.सारिका शेख,मुख्याध्यापाक श्री मुंजमकर,शिक्षक गावडे सर,गट समन्वय श्री.तेजराव दुर्गे,राकेश सडमेक व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *