आपला विदर्भ

किष्टापूर (वेल)येथे नवीन ग्रामपंचायत भवनाची भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*किष्टापूर (वेल) येथे नविन ग्राम पंचायत भवनाची भूमिपूजन सम्पन्न
▪️जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.
🔸जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय किष्टापूर (वेल) येते ग्राम पंचायत भवन नसल्याने गावातील समाज मंदिरात ग्राम पंचायतींचे कामकाज सुरू होते सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती असल्याने सदर ग्राम पंचायत पण जि.प.अध्यक्ष यांच्या कार्यक्षेत्रात असल्याने जि.प.अध्यक्ष यांनी स्वतः लक्ष घालून ग्राम पंचायत भवनासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान व १४ व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर करण्यात आले असून किष्टापूर येते सुसज्ज असे ग्राम पंचायत भवनाची बांधकाम करण्यात येणार असून आज *जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार
यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.
या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,होते यावेळी उपसभापती सौ. गीताताई चालुरकर,माझी उपसरपंच श्री.भगवान आत्राम,माझी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,पोलीस पाटील महेश अर्का,ग्रा.प.सदस्य श्री.नरेश मडावी,भारत आत्राम,अनिल दब्बा,त.मू.अध्यक्ष श्री.उमेश मौहूर्ले,हरी आत्राम,आनंद चाहकाटें,भैयाजी दब्बा,कनिष्ठ अभियंता श्री.चिंवडे,रामटेके,ग्राम पंचायत सचिव श्री.कापकर,व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *